दि 21/02/2025 घडलेला हा प्रसंग अवैध वाळू चे आणखी पाच निष्पाप बळी. प्रशासन अजून किती जणांचे बळी घेणार? भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघातील पासोडी गावच्या शिवारात पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर मध्यरात्री वाळूचा टिप्पर ओतल्याने वाळूखाली दबून 5 जणांना मृत्यू झाला आहे. दि. 22 फेब्रुवारी, शनिवारी पहाटे 3.30 वाजता ही घटना घडली. अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या टिप्परने पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास थेट पत्र्याच्या शेडवर वाळू ओतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने वाळूच्या ढिगाऱ्याखालून एक लहान मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. इतर पाच जणांचा मात्र जागेवरच मृत्यू झाला आहे. जाफराबाद तालुक्यातील पासोडी शिवारात एका पुलाच्या कामासाठी हे मजूर आले होते. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणाजवळच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये हे कुटुंब झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता आलेल्या वाळूच्या टिप्परचालकाने निष्काळजी पणाने वाळूचा टिप्पर पत्र्याच्या शेडवर रिचवल्याने शेडमध्ये झोपलेले 6 जण ढिगाऱ्याखाली दाबले गेले. घरात समोरच्या खोलीत झोपलेल्या महिलेच्या हा प्रकार लक्षात हा प्रकार तिने आरडाओरडा केला असता टिप्परचालकाने तेथून पळ काढला. महिलेने आजूबाजूच्या गोठ्यावर जाऊन शेतकऱ्यांना बोलावून आणले असता त्यांनी वाळू बाजूला करून पाच जणांना बाहेर काढले. त्यापैकी एक 12 वर्षीय मुलगी मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. मात्र इतर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये गणेश काशिनाथ धनवई (वय -50) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, भूषण गणेश धनवई (वय 17) रा. गोळेगाव, ता. सिल्लोड, राजेंद्र दगडूबा वाघ (वय -40) रा. दहिद, ता. बुलढाणा, सुनील समाधान सपकाळ, वय -20 रा. पद्मावती, ता. भोकरदन जि. जालना, सुपडू आहेर, (वय 38) रा. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव अशी मृतकांची नावे आहेत. मृतक सर्वजण एकमेकांचे सख्खे नातेवाईक असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. राज्यात वाळू उपसा बंदी असूनही अवैधरित्या सर्रास वाळूउपसा सुरू आहे. राजकिय वरदहस्त आणि पोलीस व महसूल अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने ठेकेदार मुजोर झाले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर तातडीने चौकशी करून गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबियांना मदत करण्यात यावी
सीएम हेल्पलाइन में किया कॉल, महज दो दिन में ही दीपक साहू को मिला नई नंबर प्लेट
18 hours ago
रोजगार मेले की सभी तैयारियां समय पर रोजगार मेले के सफल आयोजन के लिये तैयारियां तेज कलेक्टर ने ली समीक्षा बैठक
18 hours ago
नगर निगम की लापरवाही
18 hours ago
(no title)
20 hours ago
*सुश्री छाया सोनी के निधन उपरांत हुआ नेत्रदान*
20 hours ago
*लायन्स क्लब खण्डवा द्वारा 22 वे वर्ष में की भंडारे, आरओ वाटर व ठहरने की व्यवस्था*
20 hours ago
छोटे सरकार पहुंचे खंडवा दादाजी धाम पहुंचकर की पूजा अर्चना।
20 hours ago
खंडवा पुलिस द्वारा “श्रवण माह” मे शांति व्यवस्था बनाये रखने एवं कावड़ यात्री कि सुरक्षा व्यवस्था को लेकर समस्त थाना/चौकी प्रभारी द्वारा अपने अपने क्षेत्र के कावड़ यात्रा संचालक एवं ढाबा संचालक कि बैठक आयोजित कर दिये आवश्यक दिशा निर्देश।*