
रायगड– पुणे स्वराज्य पक्ष पुणे जिल्हा निमंत्रक शिवशंभूप्रिया जांभळे यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब जन्म सोहळा पार पडलेल्या नंतर महाराष्ट्रातील सर्व रयतेला शिवभक्त शिवकन्या गडकोट प्रेमी यांना आव्हान केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आपल्या घरावर ,आपल्या गावात स्थापन करावे आपल्याला विचार बदलायचा आहे.
गाव तिथे शाखा नाही गाव तेथे आराध्य दैवत छत्रपती शिवशंभू स्मारक स्थापना करा. रूद्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान सस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील याचे एक हजार एक निःशुल्क शिवशंभू स्मारक वाटप संकल्पना घेतली आहे.
बाळराजे आवारे पाटील यांच्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची संपर्कप्रमुख अण्णा साहेब जाधव व महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख आदमने मराठे पाटील राज्य प्रवक्ता प्रवीण भैय्या नांगरे, महिला आघाडी मराठवाडा अध्यक्ष राजश्रीताई उंबरे, संभाजी ब्रिगेड मधील महाराष्ट्रातील तमाम शिवभक्त शिवकन्या व शिवप्रेमी यांनी या संकल्पनेचा युवकांनी लाभ घेऊन यांच्याशी संपर्क करावा अशी घोषणा स्वराज्य पक्ष पुणे जिल्हा निमंत्रक यांनी राजमाता जिजाऊ जन्म सोहळ्यामध्ये घोषणा केलेली आहे.