
रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स ची रोटरी वर्ष 2025-26 साठीची कार्यकारिणी जाहीर
रोटे डॉ विरजा संदीप देशमुख यांनी स्वीकारला नूतन अध्यक्षा म्हणून पदभार
*माता – बाल संगोपन आणि महिला स्वयंरोजगार व सशक्तीकरनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचे मनोदय केला व्यक्त*
नूतन अध्यक्षा डॉ विरजा देशमुख ह्या बापजी हॉस्पिटल चे संचालक डॉ संदीप देशमुख यांच्या धर्मपत्नी असून हिरण्यगर्भ गर्भसंस्कार एल एल पी च्या माध्यमातून आतापर्यंत तीन हजाराहून हि जास्त गर्भवती महिलांना त्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे.
—
1. मीटिंगची सुरुवात:
मीटिंगचे संचालन मावळते अध्यक्ष रोटे. डॉ. स्वप्निल शिंदे आणि सचिव रोटे. संदीप चव्हाण यांनी केले. त्यांनी 2024-25 या वर्षातील क्लबच्या कार्याचा आढावा सादर केला व आगामी वर्षासाठी नवीन टीमला शुभेच्छा दिल्या.
—
2. नवीन कार्यकारी मंडळाचा पदभार स्वीकार:
2025-26 वर्षासाठी पुढील कार्यकारी मंडळाने पदभार स्वीकारला:
अध्यक्ष: रोटे. डॉ. विरजा देशमुख
सचिव( projects): रोटे. भरत दायमा
सचिव (admin) : रोटे. वृषभ सुराणा
कोषाध्यक्ष : रोटे पराग बढे
—
3. जबाबदाऱ्या व मनोगते:
खालील पदाधिकाऱ्यांनी विविध जबाबदाऱ्या स्विकारून आपले मनोगत व्यक्त केले:
रोटे. पराग बडे
रोटे. ऋषभ सुराणा
रोटे. संदीप देशमुख
रोटे. नरेश दोशी
रोटे. योगेश पाटील
रोटे. केतन वाघ
रोटे. डॉ. शामराव जाधव
रोटे. भरत दायमा
रोटे. अजय घोरपडे
रोटे. हरीश जैन
रोटे तमाल देशमुख
रोटे विजयानंद सुर्यवंशी
रोटे प्रियंका खेडकर
रोटे राज पुन्शी
रोटे हर्षद ढाके
रोटे दिलीप पवार
रोटे जयवीर पाटील
रोटे महेंद्र वर्मा
आदी….
—
4. क्लब लर्निंग फॅसिलिटेटरचे मनोगत:
असिस्टंट गव्हर्नर रोटे. डॉ. संदीप देशमुख यांनी क्लब लर्निंग फॅसिलिटेटर म्हणून आपले मनोगत मांडले व नवीन कार्यकारिणीला दिशा व प्रेरणा दिली.
—
5. ठराव व निर्णय:
✅ क्लब मीटिंग वेळ व स्थळ:
दर बुधवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत बापजी हॉस्पिटल येथे क्लब मीटिंग होईल.
✅ सेवा प्रकल्प:
रोटरी डायलिसिस सेन्टर तसेच मोतीबिंदू मुक्त चाळीसगाव अभियान प्रकल्पासाठी पूर्ण टीम प्रयत्नशील राहील.
स्पोर्ट्स झोन उभारण्याचा संकल्प.
✅ इन्स्टॉलेशन कार्यक्रम:
28 जून 2025 रोजी उत्सवमय पद्धतीने इन्स्टॉलेशन आयोजित करण्यात येईल.
✅ वार्षिक कार्यक्रम नियोजन:.
✅ नवीन उपक्रम योजना:
✅ सेवा उपक्रम:
सार्वजानिक महिला स्वच्छतागृह उभारणी
विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी व अभ्यासिका स्थापनेसाठी नियोजन.
ग्लोबल ग्रांट अथवासी एस आर ग्रांट अंतर्गत सोलर प्रकल्प
—
6. सांगता :
मीटिंग सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सेक्रेटरी admin – रोटे ऋषभ सुराणा यांनी आभार प्रदर्शन केले .
सर्व सदस्यांनी नवीन वर्षात सक्रिय सहभाग देण्याचे आश्वासन दिले.