ताज़ा ख़बरें

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या वतीने भारतीय संविधान जागर

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या वतीने भारतीय संविधान जागर

 

प्रशांत गायकवाड -धाराशिव -मुरूम

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ मुरूम यांच्या वतीने आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या सहकार्याने मुरूम येथे भारतीय संविधानाचा जागर हा कार्यक्रम स्लाईड शोच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये भारतीय संविधान इतिहास आणि जडण घडण त्यातील कलम आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान निर्मितीतील कार्य यावर सखोल अशी माहिती प्रकल्प व्यवस्थापक सबोध थोरात यांनी सांगितली. या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून प्रा डॉ महेश मोटे आणि प्रमुख पाहुणे सुबोध थोरात हे उपस्थित होते. प्रा डॉ महेश मोटे यांनी विचार व्यक्त करत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना निर्मितीमध्ये केलेले योगदान आणि या देशाला खरी लोकशाही ही बाबासाहेबामुळे मिळाली असे मत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे आशिष मुरूमकर (उपाध्यक्ष उत्सव मंडळ), गौतम गायकवाड (सह सचिव), संतोष कांबळे(कोष्याध्यक्ष), धर्मवीर बनसोडे, पवन कांबळे, प्रणित गायकवाड, अशोक गोडबोले, सुधाकर कांबळे, पंकज बनसोडे, हिरालाल गायकवाड यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा महेश कांबळे आणि आभार प्रशांत गायकवाड यांनी केले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!