ताज़ा ख़बरें

वाढते अपघात रोखण्यासाठी अनाधिकृत होर्डीग्सवर कारवाई करा

चाळीसगाव –

शहरात गेल्या काही महिन्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक तरुण आणि व्यवसायिक आपल्या प्राण्यांना मुकले आहेत. याचे कारण म्हणजेच चाळीसगाव शहरात विविध ठिकाणी मोक्याच्या जागेवर लावल्या जात असणारे मोठमोठे होर्डिंग, जाहिरात बॅनर असल्याचे शहरीवासीयांमधून चर्चिले जात आहे.

अनेक वाहनधारकांचे या बॅनर्समुळे लक्ष विचलित होते तसेच मोठ्या वाहनधारकांना छोटे दुचाकीस्वार व वाहने दिसत नसल्यामुळे अपघात होत आहेत हे अपघात टाळण्यासाठी या + अनाधिकृत होर्डिंगसवर त्वरित कारवाई करावी तसेच यापुढे असे होर्डिंग लागू नये व शहरातील प्रमुख असलेल्या

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची मागणी

चौकांमध्ये म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, नागद रोड चौफुली, सदानंद हॉटेल

चौक, राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेज चौक, आनंदीबाई बंकट हायस्कूल चौक, अशा मुख्य रहदारीच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक टाकावेत अशा आशयाची मागणी करणारे निवेदन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून नगरपालिका मुख्याधिकारी चाळीसगाव तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले. या निवेदनाची दाखल घेऊन त्वरित कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे विरेंद्रसिंह (टोनू) राजपूत, दिलीप घोरपडे, प्रेमसिंह राजपूत, सिद्धार्थ राजपूत, दीपक पाटील, सरदारसिंह राजपूत, निलेश राजपूत, करण राजपूत, किशोर राजपूत, सौरभ राजपूत, करण पवार, सुनील बिडे, सागर परदेशी, विकी परदेशी, अमोल पवार, ललित पाटील, अमोल लवटे, प्रशांत चव्हाण.

Show More
Back to top button
error: Content is protected !!