मुंबई:
आज दिनांक २८ डिसेंबर २०२४रोजी सह्याद्रि अतिथीगृहात एमएसईबी होल्डिंग कंपनीच्या पार पडलेल्या बैठकित मा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर ह्यानी मा. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फड़नवीस ह्यांच्या प्रमुख उपस्थितित होल्डिंग कंपनिच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला!
उपाध्यक्ष तथा ऊर्जा राज्यमंत्री ह्या नात्याने मा मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस ह्यांच्या मार्गदर्शनखाली ऊर्जा विभाग अधिकाधिक लोकाभिमुख करने ,हरित ऊर्जेचा अधिक वापरावर भर देने, मराठवाड़्यासह राज्यातील वीज समस्यंचे निराकरण करने बाबत माझी आग्रही भूमिका राहिल आसा विश्वास मा. ना. मेघना बोर्डीकर ह्यानी या प्रसंगी व्यक्त केला.
बैठकीकरिता प्रधान सचिव (ऊर्जा),महावितरण, महापारेषण, महानिर्मिति कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते