वाशिम (जिला प्रतिनिधि) नवाज़िश अख्तर मुख़्तार अहमद
मेडशी :दि 22 डिसेंबर रोजी साई गजानन मित्रपरिवार व अकोला थॅलेसेमिया सोसायटी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 22 डिसेंबर 2024 रोजी अंश मोबाईल व झेरॉक्स सेंटर मेडशी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिर मध्ये मेडशी गावातील 40 ते 50 इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान करून. थॅलेसमिया, सिकल सेल पिढीत, व इतर रुग्णकरिता माणुसकीच्या भावानेतुन कोणाचा तरी जीव वाचेल या उद्देशाने रक्तदान केले. या भव्य रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व टी-शर्ट भेट म्हणून दिले जाईल. सूत्रानुसार कळविण्यात आले
या कार्यक्रमात साई जीवन रक्तपेढी अकोला मधून दिनेश हिवराळे, गौरव खंडार, मनोज तेलगोटे, देवेंद्र हिवराळे,यानी रक्तदात्याकडून रक्त संकलन केले. आयोजक म्हणून. विजय मेटांगे( सीआरपीएफ ) विशाल बद्रीनाथ केवट, जावेद धन्नू भवानीवाले. संतोष बबन तायडे. विठ्ठल विष्णू भागवत याच्या सहकार्याने हे कार्यक्रम संपन्न करण्यात आले.