Uncategorizedकृषिताज़ा ख़बरेंमहाराष्ट्रमौसम

आदिवासी बांधवांनी वणी, सापुतारा रस्त्यावर थाटले स्टॉल

स्ट्रॉबेरी विक्रेत्यांना उत्पन्नाचा स्त्रोत मिळाल्याने अच्छे दिन

     नाशिक,सप्रशृंगगड : प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : लाल तुटुक व तोंडाला पाणी आणणारी स्ट्रॉबेरी सध्या चांगलाच भाव खाऊन जात आहे आदिवासी बांधवांना रोजगाराचा नवा मार्ग मिळाल्याने अच्छे दिन आल्याचे चित्र आहे.

      सुरगाणा व कळवण तालुक्यातील काही भागातील पिके फळे रानभाज्या जिल्ह्यातील नागरिकांचे आकर्षण बनल्या आहेत. त्यामध्ये रस्त्याच्या कडेला छोट्या दुकानातील लालबुंद स्ट्रॉबेरी आता येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. या स्ट्रॉबेरीने आदिवासी भागातील जनतेला व शेतकऱ्यांना आर्थिक आधार दिला आहे. तालुक्यातील काही भागात थंडीचा हंगामात स्ट्रॉबेरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात असल्याने या पिकाला चांगला बहर येत आहे. लाल-गुलाबी रंगाची, गोड-आंबट चवीची, छोटा कागदाच्या खोक्यामधील स्ट्रॉबेरी पाहिल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. थंडीच्या दिवसात आरोग्यदायी असणाऱ्या स्ट्रॉबेरी ला चांगली मागणी असते. सध्या थंडीचा हंगाम असल्याने या पिकाला चांगला बहर आला असून आदिवासी भागातील शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. काही शेतकरी मोठ्या घाऊक व्यापारी वर्गाला माल देतात. काही मुंबई, गुजरात व महाराष्ट्रातील विविध भागात विक्रीसाठी पाठवितात; परंतु काहींना तत्काळ नगरी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी वणी, सापुतारा विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी छोटी दुकाने थाटून स्ट्रॉबेरी विक्रीसाठी ठेवतात.

      या विक्रीतून परिसरातील आदिवासी शेतकरी बांधवांना चांगल्यापैकी अर्थार्जन होऊ लागले आहे. पेठ, कळवण, सुरगाणा, ननाशी घाटाजवळील काही भाग तसेच घाटमाथ्यावरील लाल मातीत पिकणारी लाल भडक आंबट-गोड स्ट्रॉबेरी वणी, सापुतारा, सप्तशृंगी गड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दिसत असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करीत आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!