अन्य खबरेमहाराष्ट्र

जरांगे पाटलांचे मध्यरात्री नांदगावत भव्य स्वागत

जरांगे पाटलांची तब्बल १५ तास प्रतिक्षा मध्यरात्री ३ वा जंगी स्वागत

नांदगांव: (प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर) दि ८ रोजी सकाळी ११ वाजे पासून नांदगांव येथे सकल मराठा समाज जरांगे पाटलांची वाट बघत होते दुसऱ्या दिवसी दि ९ जानेवारी पहाटे ३ वा पाटीलांचे नांदगांवी आगमन होताच त्यांचे अहिंसाचौकात जंगी स्वागत करण्यात आले.

नांदगांव शहरातील श्रीरामनगर हद्दीत अहिंसा चौकात मनोज जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत झाले या दरम्यान जंबो फुलांचा हार क्रेनला लावण्यात

येऊन पाटलांचे अभिनंदन केले या प्रसंगी प्रथम छत्रपतीं शिवाजी राजे यांच्या पुतळ्याला हार घालुन नंतर पाटालांनी सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार स्वीकारला. यावेळी मध्यरात्रीचे ३ वाजले होते पाटील यांनी समाजाला धिर धरा संयम राखा हक्काचे आरक्षण मिळेलच असा युक्तीवाद करीत उपस्थीतांची मने जिंकली.

यावेळी अनेक जेसीबीच्या मदतीने उंचावरून फुले उधळत पाटलांचे जंगी स्वागत केले . चार वाजे नंतर ते पुढे मार्गाक्रंम झाले. जरांगे पाटील येण्यापूर्वी तांदुळवाडी येथील निवृत रेल्वे कर्मचारी दादासाहेब पुंडलिक काळे यांचे हृदयविकाराणे निधन झाले ते मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताच्या तयारीत ते नाचले कुदले त्यात त्यांना ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला आणी त्यांचे निधन झाले त्यांची जरांगे पाटलांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिली. दरम्यान जरांगे पाटील यांनी काळे कुटुंबीयाची हॉस्पीटल मध्ये भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी हजारो सकल मराठा समाज बांधव स्वागताला उपस्थित होते. तब्बल १५ तासाच्या प्रदिर्घ प्रतिक्षे नंतर जरांगे पाटील हे नांदगांव नगरीत दाखल झाले होते .

Show More
Back to top button
error: Content is protected !!