प्रेस नोट
प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
नागपूर, दि. 28 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द या घटकातील बेरोजगार मुला-मुलींना स्वयं रोजगारासाठी व व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरू करण्यासाठी विविध व्यावसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत निःशुल्क तीन ते सहा महिन्यापर्यंत प्रशिक्षण दिले जाते व प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दरमाह विद्यावेतनसुध्दा अदा करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षामध्ये नागपूर जिल्हास एकूण १ हजार ८५० इतके प्रशिक्षण योजनेचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्हातील सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द (मांग, मातंग व चांभार वगळता) मुला-मुलींनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगार उभारण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक योगिता काकडे यांनी केले आहे. ऑनलाईन अर्ज https://www.nbrmahapreit in/home या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येणार आहेत. अधिक माहितीकरीता ७३८५२६८८१७/०७१२-२२३८६५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे – शाळा सोडल्याचा दाखला, बारावीची मार्कशीट, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयकृत बँक) आणि दोन फोटो.