
प्रति,
वृत्तपत्र संपादक,
कृपया प्रकाशनार्थ सादर.
*जल प्राधिकरण विभागाचा प्रताप…. महिलेला आले एक लाख 40 हजार रुपयांचे पाण्याचे बिल…,. महिलेने घेतली मनसे कार्यालयात धाव….*
*असे की ग्रामीण भागात राहणाऱ्या एका महिलेला चक्क एक लाख 40 हजार रुपये बिल पाठविले. बिल भरण्याकरिता अधिकाऱ्यांकडून तिच्यावर दबाव टाकण्यात येत होता. उपरोक्त महिलेने या विषयाबाबत परस्पर पत्र व्यवहार देखील केले होते. परंतु कुठल्याही शासकीय विभागात सामान्य जनतेला न्याय मिळत नसतो हे परत सिद्ध झाले . आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष शहर उपाध्यक्ष विभाग अध्यक्ष विभाग संघटक व अन्य पदाधिकाऱ्यांसह जल प्राधिकरण विभाग विभागाच्या कार्यालयात सिव्हिल लाईन्स येथे धडक दिली. सुमारे दोन तास वाट पाहिल्यानंतर अभियंतांसोबत भेट झाली. मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांची चूक लक्षात आणून दिली व संबंधित विषयासाठी दोषी असलेल्या अभियंतांवर कारवाई करण्याची मागणी केली व तशी लेखी तक्रारही दिली. उपरोक्त विषयांवर ताबडतोब आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल अशी स्पष्ट चेतावणी देण्यात आली. त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित नागपूर शहर अध्यक्ष चंदू भाऊ लाडे, उपशहर अध्यक्ष तुषार भाऊ गिऱ्हे, विभाग अध्यक्ष हर्षद दसरे, नितीन वाकोडे, सुनील गवई, विभाग संघटक चेतन शिराळकर, चेतन बोरकुटे व मोठ्या संख्येने इतर पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.*