
प्रेस नोट
मनीष नगर येथे घरफोडी
बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मनीष नगर येथील जयंती नगरी 9 जवळील हनुमान मंदिराच्या मागे निहार रेसिडेन्सी येथे दिनांक 23/06/2024 रोजी रात्री 2.00 वाजता निलेश येळणे यांच्या राहत्या घरी चोरट्याने काही ऐवज लंपास केला.
ते सर्व त्याचा मुलांना सुट्टी असल्या कारणाने पचमढ़ी येथे फिरायला गेले होते. थेतून आल्यानंतर त्यांचा दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांनी त्यांच्या शेजारच्याना महिती दिली.त्यांनी घरात जाऊन तपासणी केली असता त्यांच्या घरातील सर्व सामान अस्त्यावस्त पडलेले दिसले व काही ऐवज लंपास केल्याचे निर्दशनास आले. त्यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चोरट्याचा शोध सुरू केला आहे.