रामटेक वरून नागपूर कडे जाताना वाहनाचा वेगावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सचा वेग प्रचंड वाढला व अनियंत्रित होऊन समोरील बाजूस विरूध्द दिशेने येणाऱ्या ऑटोवर धडकली. त्यात ऑटो पूर्णपणे चक्काचूर झाला.या गंभीर अपघातात ऑटोचालक व प्रवाशी आर्मीचे जवान असे मिळून 6 जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी 2 जण मृत पावले, 4 जनाची प्रकृति अद्यापही गंभीर आहे.ट्रॅव्हल्स चालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत येत असल्याने तेथील पोलिस स्टेशन चे हवालदार या प्रकरणाची चौकशी करीत आहे.
4,036 Less than a minute