ताज़ा ख़बरेंलातूर

महाराष्ट्र. कुठल्या क्षेत्रात किती सोयाबीन उत्पन्न….

लातूर विभागात सोयाबीनच्या उत्पादकतेला उतरती कळा

लातूर रिपोर्टर.मराठवाड्यात सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र हे लातूर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आहे. पिकाच्या उत्पादकतेवर शेतकऱ्यांचे उत्पन्न ठरविले जाते. खरिपातील सोयाबीनच्या उत्पादकतेची आकडेवारी समोर आली असूनसर्वात कमी उत्पाकता ही परभणी जिल्ह्याची राहिलेली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि पीक जोमात असातानाच पाण्याची कमतरता याचा परिणाम पिकांवर झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

लातूर विभागात लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे. या पाच जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र हे २८ लाख ३५ हजार हेक्टर एवढे असून यापैकी तब्बल २४ लाख ६४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला होता.

सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी हुकमी पीक मानले जाते त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून वर्षागणिस या पिकाच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. पण निसर्गाचा लहरीपणा आणि अनियमित पाऊस यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे.

गत हंगामात केवळ नांदेड जिल्ह्यात सरासरीएवढा पाऊस झाला होता. त्यामुळे या जिल्ह्याची हेक्टरी उत्पादकता ही १६ क्विंटल ३७ किलो एवढी झाली तर सर्वात कमी उत्पादकता परभणी जिल्ह्यात ११ क्विंटल ७५ किलो एवढी राहिलेली आहे.

पिकाची उत्पादकता ही त्या क्षेत्रावरील वातावरण, पाण्याची उपलब्धता आणि त्यानुसार उतारा यावर ठरते. पिकाची उत्पादकता ही कृषी, महसूल आणि पीकविमा कंपनीचे प्रतिनीधी ठरवतात. उत्पादकतेनुसार शासकीय मदत, नुकसानभरपाई ही ठरली जाते.

पीकविमा योजनेच्या वेगवेगळ्या टप्यांमध्ये उत्पादकता ही देखील महत्वाची असते. यंदा लातूर जिल्ह्यात कृषी आणि पीकविम्याच्या अहवालात तफावत होती. कृषी विभागाने जिल्ह्यातील ६० ही मंडळातील शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळावी असा अहवाल सादर केला होता.

यावर मात्र विमा कंपनीने आक्षेप घेतल्यानंतर हे प्रकरण थेट केंद्रीय समितीकडे गेले होते. तेव्हा पिकाच्या उंबरठा उत्पादकतेवर मदतीचा निर्णय घ्यावा अशा सूचना केंद्रीय समितीने दिल्या होत्या.

या निर्णयानुसार लातूर जिल्ह्यातील २८ मंडळातील शेतकरी हे अग्रिमपासून वंचितच राहिले आहेत. कृषी विभागाने खरिपातील पिकांची उत्पादका घोषित केली आहे. सर्वच पिकांच्या उत्पादकतेमध्ये घट झाली असून सोयाबीनपाठोपाठ तूर पिकाला मोठा फटका बसला आहे.

उत्पादन घटूनही दर मिळेना

उत्पादनात घट झाल्यावर शेतीमालाच्या दरात वाढ होते हे बाजारसमितीचे गणित असते. यंदा खरिपातील तूर वगळता इतर सर्वच पिकांच्या दरातून शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. सध्या तुरीला १० हजार २०० असा दर मिळत आहे. तर सोयाबीनचे दर हे गेल्या ६ महिन्यांपासून ४ हजार ५०० रुपयांवर स्थिरावले आहेत.

पीक पद्धतीमध्ये बदल गरजेचा

वर्षानुर्षे मराठवाड्यातील शेतकरी हे सोयाबीनचाच पेरा करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट तर होतेच पण शेत जमिनीवरही त्याचा परिणाम होता. तुरीचे क्षेत्र घटत असताना आता दरात वाढ होत आहे. बाजारपेठेचा अभ्यास करुन पीक पद्धती निवडली तर त्याचा फायदा होतोच असे लातूर उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!