
*प्रसिद्ध तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, 4 भाविकांचा मृत्यू, मोठी खळबळ*
आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर तिरुपती पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.
तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपतीला जावून बालाजींचं दर्शनही घेतात. तिरुपतीचं बालाजींचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात आज अतिशय हृदय हेलावणारी घटना घडली आहे.
*आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात* वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकनसाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर लायनीत उभे आहेत. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी लायनीत उभे राहायला सांगितले तेव्हा ही चेंगराचेंगरीची घटना घडली.