Uncategorizedउल्हासनगरमहाराष्ट्र

उल्हासनगर शहरातील विमुक्त जाती अनू क्र VJ 7असलेल्या लबान या जाती बरोबर लबाना चा समावेश करण्याबाबत ची मागणी

उल्हासनगर:- उल्हासनगर शहरातील विमुक्त जाती अनू क्र VJ 7असलेल्या लबान या जाती बरोबर लबाना चा समावेश करण्याबाबत ची मागणी शहरातील लबाना समाजाने आमदार कुमार आयलानी यांच्याकडे सातत्याने करीत असून आमदार कुमार आयलानी यांनी ही मागणी लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री नामदार श्री अतुल सावे यांच्या कडे केली होती त्या मागणीला अनुसरून आज दिनाक २१/२/२०२४ रोजी मा नामदार श्री अतुल सावे यांनी आपल्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीमध्ये लबाना समाजाला VJ 7 मधे असलेल्या लबान बरोबर लबाना असे करण्यात यावी अशी मागणी आमदार कुमार आयलानी यांच्या नेतृवाखाली भाजप शिष्टमंडळाने इतरमागास बहुजन कल्याण मंत्री नामदार श्री अतुल सावे यांच्या कडे केली असून यावेळी इतर महत्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. या वेळी आमदार कुमार आयलानी, माजी नगरसेवक लाल पंजाबी, राजेश वधरिया, अजित सिंग लबाना, मुखी राजा सिंग,त्रिलोकसिंग ,भागू सिंग, तसेच इतर मागासविभाग प्रधान सचिव श्रीमती सिंगारे, इतर मागास आयोगाचे सदस्य सचिव व संबंधित विभागाचे अधिकारी आदी हजर होते याबाबत आपण आणि राज्य सरकारच्या वतीने सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असे आश्वासन मा मंत्री महोदय यांनी आमदार कुमार आयलानी याना दिले आहे

Show More
Back to top button
error: Content is protected !!