
विक्रोळी, प्रतिनिधी : कन्नमवार नगर येथील स्वयंभू हनुमान गोविंदा पथक यंदा आपल्या स्थापनेची ५० वर्षे पूर्ण करत असून सुवर्णमहोत्सवी वर्ष विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. पाच दशकांपासून सामाजिक बांधिलकी जपत आणि गोविंदा परंपरेचा वारसा जतन करत या पथकाने विक्रोळीसह संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सन १९७६ मध्ये संस्थापक सरचिटणीस स्व. व्ही. एच. सकपाळ यांच्या पुढाकारातून स्वयंभू हनुमान वसाहतीची स्थापना झाली. अनेक अडचणी आणि विरोधाचा सामना करत गरजू कुटुंबांना एकत्र आणून त्यांनी वसाहतीची उभारणी केली. त्यानंतर स्वयंभू हनुमान मंदिराच्या प्रेरणेतून धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा सुरू झाली.
केंद्र सरकार, राज्य सरकार, बी ए एस टी, मुंबई महापालिका, खाजगी, व्यवसायिक अशा कर्मचारी बंधूंनी एकत्र येऊन हिच्या जडणघडणीसाठी अपार मेहनत घेतली. गेल्या पाच दशकांत श्रावण ग्रंथपारायण, सत्यनारायण महापूजा, श्रीकृष्ण जन्मोत्सव, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, सामुदायिक सण-उत्सव, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, व्यसनमुक्ती अभियान, रक्तदान, पूरग्रस्त व भूकंपग्रस्तांना मदत, होळी , मकरसंक्रांत, दसरा दिवाळी सामुदायिक फराळ योजना, स्वयंभू स्पोर्ट्स क्लब, सामुदायिक गणेशोत्सव दर्शन, सार्वजनिक स्वयंभू गणेशोत्सव, वैचारिक धार्मिक स्थळांना भेटी, साई भंडारा, देशातील थोर नेत्यांचा आदरभाव ठेवून सार्वजनिक जयंती साजरी करणं, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन, विविध खेळांच्या स्पर्धा, शाळांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव बक्षिस समारंभ, आपत्कालीन मदत उदाहरण मिल कामगार, कुंभमेळा, व्यसनमुक्ती, सभासदांच्या दुःखा प्रसंगी दुखवटा रूपाने मदत जाती जमातींत भेदभाव न मानने, सर्वधर्मसमभाव जोपासणे, विविध धर्मियांच्या सणानिमित्त त्यांना योग्य सहकार्य करणे.
आरोग्य विषयी : गोवर, धनुर्वात, कांजण्या, देवी पोलिओ लस टोचणे, दर पंधरा दिवसांनी जंतूनाशक फवारणी करणे, नगरात विविध प्रकारच्या पिक्चर स्लाईड दाखवून रहिवाशांमध्ये जनजागृती करणं अशा विविध प्रकारचे सर्वधर्मसमभावाची जपणूक करणारे अनेक उपक्रम स्वयंभू हनुमान नगरा तर्फे राबविण्यात येतात.
१९७० आणि १९८० च्या दशकात स्वयंभू हनुमान गोविंदा पथकाने पौराणिक चित्ररथांच्या माध्यमातून विशेष लोकप्रियता मिळवली. सीताहरण, कंसवध, विश्वामित्र, श्रीकृष्ण जन्म, द्रौपदी स्वयंवर, सरपंजरी भीष्माचार्य, सत्यवान-सावित्री, जयद्रथ वध, किरात पारधी बेलपत्र अनारसे त्यातून भगवान शंकर प्रसन्न होतात असे अनेक देखावे सादर करीत आले होते, यांसारखे धार्मिक देखावे प्रेक्षकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. या चित्ररथांच्या निर्मितीत अनेक कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले. आता असे देखावे जरी कालबाह्य झाले असले तरी श्री गोविंदाला व्यापारी स्वरूप आले असले तरी स्वयंभू गोविंदा पथक आपली धार्मिकता अधिक तेजाने सर्वांच्या आशिर्वादाने विनम्रपणे प्रकट करीत आहे.
तया काळात गोविंदा साठी धडपड करणारे अध्यक्ष श्री गजानन जाधव, सरचिटणीस विश्राम सकपाळ, चिटणीस लक्ष्मण साळुंके आणि संपूर्ण चित्ररथाचे रंगकाम करणारे आर्टिस्ट शिवराम हिंदळेकर , चित्ररथातील कलाकार सर्वश्री दादा मस्के, मारुती बोडके, शांताराम लबडे, भिकाजी केसारकर, बाबासाहेब बोडके, अशोक काळे, बाळा राणे, नामदेव सणस, लक्ष्मण साळुंके, विजय वेंगुर्लेकर, चांगदेव घुगे, मधुकर पवार, शिवराम कांबळे असे स्थानिक रहिवासी भाग घेत असे.
आता नवीन पिढीनेही ही परंपरा समर्थपणे पुढे नेली आहे. २०२५ मध्ये पथकाने आठ थरांचा इतिहास रचला, तर यंदा नऊ थरांचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्व गोविंदा सज्ज आहेत. बाळा राणे, राज सकपाळ, सागर गोळे, साई राणे, किशोर नरसाळे, रोहित मोहिते, सोहम राणे, प्रसाद पवार, निलेश कांबळे, प्रतिक पवार आणि बाहेरून आलेल्या सर्व गोविंदा मित्रांचे मनापासून आभार त्यांच्या येण्याने स्वयंभू हनुमान गोविंदा पथकांची शोभा वाढून नाव लौकीक झाले आहे.
स्वयंभू हनुमान गोविंदा पथकाला ५० वर्ष झाल्यामुळे नगररहिवाशां कडून हार्दिक शुभेच्छा.
अशी माहिती स्वयंभू हनुमान नगराचे सरचिटणीस श्री विजय (भाऊ) सकपाळ यांनी दिली.












