जळगाव: शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी चौकाचौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. नियमांची पायमल्ली केल्यावर ते दंड करतात मात्र बहुतांश वेळा ईकडे वाहतूक कोंडी असताना पोलीस मात्र मोबाईल वर बोलत असतात. आणि दुपारच्या वेळेत पोलीसच रस्तात्यावर दिसत नाही व सिग्नल सुध्दा बंद आसतात. त्यामुळे टॉवर चौकत बहुतांश वेळा अपघात होताना दिसतात तरी पोलीस प्रशासनाने योग्य ती निर्णय घेऊन कारवाई करावी. त्यानिमित्ताने आज लोकसंघर्ष पक्ष नामक राजकीय पक्षाने शहर वाहतूक शाखेला निवेदन दिले. लोकसंघर्ष पक्षातर्फे लोकसंघर्ष पक्षाचे युवा भरारीचे नेतृत्व आसलेले जिल्हाअध्यक्ष. पत्रकार. भाऊसो.सोमेश किशोर मुळे यांनी कारवाई व्हावी म्हणून विनंती केली.













