ताज़ा ख़बरें

छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

शंकरराव शरणाप्पा आष्टे प्रशाला येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

प्रशांत गायकवाड -उस्मानाबाद

लोकराजा, सामाजिक लोकशाहीचे प्रणेते,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती शंकरराव शरणाप्पा आष्टे प्रशाला येथे साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार कुलकर्णी जेष्ठ शिक्षक शिवानंद ढंगापुरे, मोनेश्वर सुतार, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले याप्रसंगी सौअनिता लाटे, अजित गवसने, प्रशांत गायकवाड, हणमंत धुळशेट्टी, शिवानंद कांबळे, सुनील वडरे, युवराज कुंभार, सौरभ आष्टे उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापक राजकुमार कुलकर्णी यांनी छत्रपती शाहू महाराजांचे विचार आजही राष्ट्राला तारक कसे आहेत याबाबत विचार व्यक्त केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत इयत्ता 10 वी तील विध्यार्थिनी कुमारी रुपाली येलूरे हिने आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत धुळशेट्टी तर आभार मोनेश्वर सुतार यांनी मानले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!