क्रिकेटदेशविदेश

2028 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत T-20 क्रिकेटचा समावेश.

भारतीय क्रिकेट संघाला सुवर्णसंधी.

तब्बल 128 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये टी-20 क्रिकेटचा समावेश…

Cricket in Olympics : ऑलिम्पिकला 125 वर्षाचा इतिहास आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची सुरुवात 1996 साली झाली होती मात्र ऑलिम्पिकच्या इतिहासात फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश झाला होता. ऑलिम्पिकमध्ये 1900 मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता.
तब्बल 128 वर्षांनंतर क्रिकेटचं लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार आहे.
यापूर्वी ते 1900 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळलं गेलं होतं. अशातच आता ऑलिम्पिक्समध्ये पुन्हा क्रिकेटचा समावेश करण्यात आल्याने क्रिडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
तीन वर्षानंतर होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ 6 संघांनाच एन्ट्री मिळण्याची शक्यता आहे.
90 क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी
2028 च्या ऑलिंपिक गेम्समधील क्रिकेट सामने टी-20 स्वरूपात खेळवले जातील. या दरम्यान 90 पुरुष आणि 90 महिला क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळेल.
याशिवाय, सर्व संघांना ऑलिंपिक खेळांमध्ये त्यांच्या 15 खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी आहे.
त्यामुळे फक्त 6 संघांना ऑलिम्पिक्समध्ये सहभागी होता येणार आहे. 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये सहा देशांचे क्रिकेट संघ सहभागी होतील, अशी पुष्टी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (IOA) केली आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!