
धाराशिव -प्रशांत गायकवाड
श्री लक्ष्मी शिक्षण प्रसारक मंडळ भुरीकवठे संचलित शंकरराव शरणप्पा आष्टे प्रशालेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री अप्पासाहेब गवसने,संचालक श्री शिरीष खुने यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमीचे पूजन करण्यात आले.मुख्याध्यापक राजकुमार कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त करत असताना त्यांचा राजकारभार आणि शेती विषयक विचारावर प्रकाश टाकला.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक राजकुमार कुलकर्णी, मोनेश्वर सुतार,ढंगापुरे एस,अजित गवसने,गायकवाड प्रशांत,सोलनकर सुहास,धुळशेट्टी हणमंत,सौ लाटे ए, शिवानंद कांबळे,सौरभ आष्टे,दिलीप व्हदलूरे,युवराज कुंभार हजर होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनेश्वर सुतार यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता अजित गवसने यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.