क्रिकेट

भारताच्या वर्ल्डकप विजेत्या मुलींना BCCI कडून 5 कोटीचे बक्षिस जाहीर.

U19 T20 World Cup 2025

क्रिकेट

भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या मुलींना BCCI कडून ५ कोटीचं बक्षीस जाहीर

Team india won Women’s U19 T20 World Cup 2025

मलेशियामध्ये भारतीय संघाने इतिहास रचला. महिलांच्या १९ वर्षांखालील भारतीय महिला संघाने पुन्हा एकदा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रविवारी आयसीसी १९ वर्षांखालील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मुलींच्या संघाला ५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले.
भारतीय संघाने २०२३ मध्ये जेतेपद पटकावले होते आणि आज २०२५ मध्ये सुद्धा निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली जेतेपद राखण्यात यश मिळवले. BCCI ने भारतीय महिला संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आफ्रिकेला ८२ धावांवर गुंडाळले. ८३ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या ११.२ षटकांत गाठले आणि ९ विकेट्सन फायनल जिंकली.

निकी प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला. भारताने संपूर्ण स्पर्धेत निर्भयपणे खेळ केला आणि अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर नऊ विकेट्स राखून विजय मिळवला. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक नूशीन अल खदीर यांच्या मार्गदर्शनाखालील विजयी संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी ५ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यात आफ्रिकेला ८२ धावांवर गुंडाळले व सोपे लक्ष्य स्वीकारले. ८३ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या ११.२ षटकांत गाठले आणि ९ विकेट्सने फायनल जिंकली. १९ वर्षांखालील महिलांचा टी-ट्वेंटी -२० वर्ल्ड कप सलग दुसऱ्यांदा भारताने जिंकला आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, भारतीय संघाच्या अतुलनीय कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!