ताज़ा ख़बरें

राळेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता व आंबेडकरी अनुयायांनी परभणी येथील भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी घटनेचा निषेध करुन तहसीलदार यांना दिले निवेदन*

राळेगाव येथे परभणी येथील भारतीय संविधानाची विटंबना झाली या घटनेचा राळेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता व आंबेडकरी अनुयायीयानी निषेध करुन तहसीलदारांना दिले निवेदन .

विटंबना करणारे दोषी मोकाट फिरत आहे . त्यांच्यावर अजुन पर्यंत कार्यवाही झाली नाही .त्यांना नेमके अभय कुणाचे ?

निप्षाप भिमसैनिक मारल्या जात असुन असे किती जिव मारणार , पोलिस व पोलिस अधिकारी यांच्या मारहाणीमुळे पोलिस कोठडीत जिव जातो व कार्यवाही होत नाही .

त्यामुळे पोलिसांनवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.तरी मारल्या गेलेल्या भिमसैनिकाच्या कुटुंबाला मदत द्यावी व अनुयायांनवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे.

व असा पुन्हा गुन्हा होणार नाही त्या गुन्हेगाराला कडक शासन करावे .व भारतीय संविधानाची शान युगानुयुगे अबाधित राहावे याकरिता कायदा व सुव्यवस्था कडक करावा व दोषींवर कारवाई कडड करण्यात यावी असे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी डॉ.विठ्ठलराव लढे, अंकूश मुनेश्वर, इंद्रजित लभाने,बाबा नगराळे, राहुल उमरे,राजु गोटे, भिमराव वागदे,अक्षय ढाले, विनायक गोटे,अभय भगत, ज्ञानदीप पुडके,कवडुजी कांबळे, अतुल उईके, प्रज्ववल पाटील व इतर राळेगाव तालुक्यातील आंबेडकरी जनता व आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More
Back to top button
error: Content is protected !!