![](https://triloknews.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20240916-WA00171-2.jpg)
*वेडशी येथे बकरी करीता चारा* *आणण्यासाठी गेलेल्या* *३७ वर्षीय इसमाचा विद्युत करंट लागुन जागीच* *मृत्यू
*वडकी पोलिस स्टेशनच्या* *हद्दीतील घटना*
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-अरविंद कोडापे
राळेगाव तालुक्यातील वेडशी येथील प्रकाश पंढरी चिव्हाणे वय ३७ वर्षे अंदाजे.रा.वेडशी हा दिनांक ३०-१२-२४ रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान रोजच्या प्रमाणे बकरीचा चारा आणण्यासाठी गेलेल्या असता चारा घेण्यासाठी येथीलच नरेंद्र ब्रम्हदेव शेन्डे यांच्या शेतात गेला होता ,पण शेंडे हा शेतकरी जंगली जनाराच्या त्रासपोटी रोजच रात्री आपल्या शेताला विद्युत करंट लावुन ठेवायचा व सकाळी लवकर करंट काढुण घेत होता.पण मृतक हा सकाळी लवकरच त्यांच्या शेतातील चारा घेण्यासाठी गेले असता त्याला करंट लावुन असलेल्या लक्षात आला नसल्याचे मृतकांला विद्युत करंट लागुन जागीच मृत्यू पावला . सदर मृतकाचा सकाळपासुन इतरत्र शोध घेतला असता दिसुन आला नाही ,पण शेन्डे शेतकरी हा करंट काढण्याकरीत शेतात गेला असता मृतक पडुन दिसला.सदर घटनेची माहिती वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांना मिळताच तातडीने वेडशी येथे जाऊन सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरीता ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे पाठविण्यात आला..पुढील तपास वडकी पोलिस करीत आहे.