Dr Manmohan Singh Death: भारताचे माजी पंतप्रधानडॉ. मनमोहन सिंग हे गुरुवारी रात्री कालवश झाले. प्रख्यात अर्थतज्ज्ञ असणाऱ्या डॉ. सिंग यांनी पंतप्रधानपदी असताना विविध योजना राबवत देशाच्या विकासात भरीव योगदान दिले. खूपच पुढचा विचार दाखवणारी एक योजना डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाला दिली आणि ती म्हणजे आधार कार्ड.
संयुक्त राष्ट्रांनी आधार कार्ड योजनेची पुष्कळ प्रशंसा केली; परंतु कमालीची गोष्ट अशी की आधार कार्ड योजनेविषयी संशय घेणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. त्यावेळचा विरोधी पक्ष आधार कार्डाविषयी आक्रमक होता. ‘हे कार्ड तयार करण्यासाठी सरकार लोकांकडून माहिती घेईल; पण त्याचा दुरुपयोग झाला तर काय?’- असा प्रश्न लोकांच्या मनात पेरला गेला.
पण त्याविषयीच्या शंका-कुशंका निराधार ठरल्या. आज आधार कार्ड सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. पॅन कार्ड असो, मोबाइल नंबर की बँकेचे खाते; सगळीकडे आधार कार्ड अनिवार्य आहे. आपण ज्या वेगाने डिजिटलायझेशनच्या दिशेने जात आहोत, त्यात आधार कार्डाचे खूप मोठे योगदान आहे.
2,512 1 minute read