ताज़ा ख़बरें
Trending

शालेय पोषण आहारासाठी कर्मचाऱ्यांनी संघर्षासाठी सज्ज राहावे—-कॉमरेड राजू गैनवार

शालेय पोषण आहारासाठी कर्मचाऱ्यांनी संघर्षासाठी सज्ज राहावे----कॉमरेड राजू गैनवार

शालेय पोषण आहारासाठी कर्मचाऱ्यांनी संघर्षासाठी सज्ज राहावे—-कॉमरेड राजू गैनवार जिल्हा- भद्रावती
नुकतेच शहीद हुतात्मा स्मारक येथे एक दिवसीय सविस्तर विस्तारित शालेय पोषण आहारासाठी कर्मचारी संघटना(आयटक)तालुक्याची बैठक संपन्न झाली.यावेळी सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉमरेड राजू गैनवार माजी

नगरसेवक तथा जिल्हा संघटक आयटक — कामगार संघटना.
प्रमुख पाहुणे म्हणून कॉमरेड वनिता कुंडावर राज्य कोषाधक्ष्य शा पो आ कर्मचारी संघटना महा.राज्य कॉमरेड नसरीन पठाण तालुका अध्यक्ष शा पो आ क संघटना. कॉमरेड शाया मोहितकर तालुका सचिव शा पो आ क संघटना पाहुण्याचे स्वागत करण्यात

आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून भाषण करताना कॉमरेड राजू गैनवार म्हणाले की सद्यस्थितीत कामगारांवर होणारे अन्याय व त्याचे निराकरण करणे हे संघटनेचे कार्य करणे अनिवार्य असल्याचे सांगितले एनपीएस निगमिकरण खाजगीकरण कामगार कायद्याचे बदलाव बाबतचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा मानस व्यक्त केला.

शा पो आ कर्मचारी शाळेत खिचडी बनविण्याचे काम बरेच वर्षापासून करीत आहे त्यांना अल्प मानधनापासून ते करीत आहे. काही शाळेत त्यांना नको ते काम सांगितले जातात हे योग्य नाही शिक्षक व मुख्याध्यापक आणि शाळेतील व्यवस्थापन गटबाजीचे राजकारण करून त्यांचेवर अन्याय अत्याचार करतात ते आम्ही खपवून घेणार नाही असे ते म्हणाले.

बैठकीचे ठराव- 12 जुन जिल्हा परिषद कार्यालय चंद्रपूर येथे भव्य धरणा निदर्शने जिल्ह्यातील सर्व कर्मचारी उपस्थित राहतील. 2024 चे सभासद नोंदणी करणे.होणाऱ्या पावसाळी विधानसभा अधिवेशनावर मुंबई येथे महा मोर्च्यात सहभागी दर्शविणे. पुढील दिशानुसार आंदोलनाची रूपरेषा ठरविणे.

या बैठकीला शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माला गायकवाड, कार्यक्रमाचे प्रास्ताविक रेखा टोंगे, आभार प्रदर्शन संगीता कोलते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणे करीता कॉमरेड आशा सोपानकर
बंडू डोंगे, आशा घाटे, सुनीता राणे, ज्योती भोयर इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

Show More
Back to top button
error: Content is protected !!