प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर ,नाशिक : डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, मार्टिन फाउंडेशन आणि स्पेस झोन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले ‘हायब्रीड रॉकेट मिशन’ गतवर्षी पट्टीपलम्, चेन्नई येथून अंतराळात यशस्वीरीत्या सोडण्यात आल्याने विश्वविक्रम झाला. सहभागी बालवैज्ञानिकांपैकी ऋतुजा काशीद व क्रितिका खांडबहाले यांचा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात महिरावणी येथील मातोश्री गीताबाई देवराम पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विश्वविक्रमी बालवैज्ञानिक ऋतुजा विलास काशीद, दादा क्रितिका माधव खांडबहाले तसेच त्यांचे मार्गदर्शक डॉ. अब्दुल कलाम फाउंडेशनच्या राज्य समन्वयिका मनीषा चौधरी आणि जिल्हा समन्वयक व विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांचा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कार्यवाह व विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वविक्रम प्रमाणपत्र, गुलाब पुष्प, शाल देऊनस त्कार करण्यात आला.
यावेळी पालक अॅड. माधव खांडबहाले, विलास काशीद, ॲड. अरुण खांडबहाले आदी उपस्थित होते.
मागील वर्षी तामिळनाडूच्या पट्टीपलममधून १५० पिको सॅटेलाइटचे अवकाशात उड्डाण झाले होते. देशातील पहिली हायब्रीड रॉकेट मोहीम यशस्वी झाली. सुमारे ५००० विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पिको सॅटेलाइट विकसित केले. त्यात नाशिक जिल्ह्यातील ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक संस्थेच्या महिरावणी येथील मातोश्री गी. दे.पाटील माध्यमिक विद्यालयाच्या बालवैज्ञानिक कुमारी क्रितिका माधव खांडबहाले (इ. ८वी) आणि ऋतुजा विलास काशीद (इ. ९वी) या विद्यार्थिनींचा तसेच त्यांचे मार्गदर्शक विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांचा समावेश आहे. या मुलींनी देशात महिरावणी शाळा व गावाचे नाव देशात पोहोचवले असून, विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.