ताज़ा ख़बरेंलातूर

महाराष्ट्र: लातूर जिल्ह्यात पुन्हा पाणी पातळी खालावली….

लातूर रिपोर्टर:लातूर जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या मार्चमधील सरासरी पाणीपातळीच्या तुलनेत जिल्ह्याची पाणीपातळी २.१३ मीटरने खाली गेली आहे. जिल्ह्याची मागील पाच वर्षांची मार्चमधील सरासरी पातळी ६.८५ होती. यंदा मार्चमधील सरासरी पाणीपातळी १२.५० वर गेली आहे. म्हणजेच २.१३ मीटरने पाणीपातळी खाली गेली आहे. यात शिरूर अनंतपाळ तालुक्यातील पातळी सर्वाधिक ४.६० मीटरने खाली गेली आहे. भविष्यात ही पाणीपातळी आणखी खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे. (Groundwater Directorate Of Survey)

१०९ विहिरींचे निरीक्षण
जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करून ही पाणीपातळी काढण्यात आली आहे. यात अहमदपूर तालुक्यातील १५, औसा १५, चाकूर सात, लातूर १८, निलंगा १७, शिरूर अनंतपाळ पाच, रेणापूर ११, उदगीर ९, जळकोट ४, देवणी आठ अशा एकूण १०९ विहिरींचे मार्चमध्ये सर्वेक्षण करून ही पातळी काढण्यात आली आहे.देवणी तालुक्यात सर्वात कमी घट

जिल्ह्यात देवणी तालुक्यात सर्वात कमी ०.११ मीटरने पाणीपातळी खाली गेली आहे, तर सर्वाधिक शिरूर अनंतपाळ तालुक्यात ४.६० मीटरने पाणीपातळी खाली गेली आहे. अहमदपूर तालुक्यात २.७४, औसा ३.३०, चाकूर २.४१, लातूर ०.३२, निलंगा २.७६, रेणापूर २.७१, उदगीर ०.७९, जळकोट तालुक्यात १.७७ मीटरने पातळी खाली गेली आहे. मागील पाच वर्षांतील मार्चमधील पातळीच्या तुलनेत यंदा पातळी खाली गेली आहे. आणखी पावसाळा सुरू होण्यास दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे ही पाणीपातळी आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्याची गरज आहे.

Show More
Back to top button
error: Content is protected !!