![](https://triloknews.com/wp-content/uploads/2025/02/Screenshot_20250122_071810.jpg)
अमेरिकेने भारतीयांना दिली अमानुष वागणूक; हातात बेड्या,पायात साखळदंड.!
US मधून परतलेले नागरिकांचा अंगावर काटा आणणारा अनुभव.
अमृतसर : विशेष म्हणजे ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वॉशिंग्टन भेटीच्या काही दिवस आधी करण्यात आली आहे.
अमेरिकेत बेकायदेशीर वास्तव करणाऱ्या १०४ भारतीय नागरिकांना घेऊन अमेरिकेच्या लष्कराचे विमान बुधवारी अमृतसर येथे पोहोचले.
अमेरिकेच्या लष्करी विमानाने अमृतसरला परतवण्यात आलेल्या शंभरहून अधिक भारतीय नागरिकांनी आपल्या भीषण प्रवासाबद्दल माहिती दिली. खोट्या दलालांकडून फसवणूक, पैशांचे नुकसान, जीवाला धोका आणि अन्नाची कमतरता यासारख्या अनेक अडचणींना त्यांनी सामोरे जावे लागले. या विमानातून तब्बल १०० भारतीय नागरिकांना मायदेशात परत आणण्यात आले . यामध्ये ३० जण हरियाणा आणि गुजरातमधून, ३० जण पंजाबमधून, तसेच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून प्रत्येकी ३, आणि चंदीगडमधून २ जण होते. पंजाबच्या नागरिकांना अमृतसर विमानतळावरून पोलिस वाहनांद्वारे त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.
या सर्व भारतीय नागरिकांना अमेरिकेच्या C-17 विमानाने परत पाठवण्यात आले आणि प्रवासादरम्यान त्यांचे हात-पाय बेड्या ठोकून ठेवले होते. ३६ वर्षीय जसपाल सिंग हा गुरदासपूर जिल्ह्यातील हरदोरवाल गावातील आहे. त्याने सांगितले की, २४ जानेवारीला अमेरिकेच्या बॉर्डर पेट्रोलने त्याला पकडले होते.जसपाल सिंगने प्रवासासाठी मोठी रक्कम खर्च केली होती. त्याने सांगितले की, मी एजंटला सांगितले होते की, मला व्हिसाद्वारे योग्य मार्गाने अमेरिकेत पाठव, पण त्याने मला फसवले. त्याने या प्रवासासाठी तब्बल ३० लाख रुपये दिले होते.जुलै महिन्यात जसपाल ब्राझीलला पोहोचला आणि त्याला सांगण्यात आले की पुढील प्रवास हवाई मार्गाने होईल. मात्र, त्याच्या एजंटने फसवले आणि त्याला अनधिकृत मार्गाने सीमा ओलांडण्यास भाग पाडले. ब्राझीलमध्ये सहा महिने राहिल्यानंतर जसपाल अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना बॉर्डर पेट्रोलने त्याला पकडले. त्याला ११ दिवस ताब्यात ठेवण्यात आले आणि नंतर भारतात परत पाठवण्यात आले.