ताज़ा ख़बरें

सिन्धीराजा की सम्पादिका हर्षा जेठवाणी व पत्रकार नारायण जेठवाणी को भी प्रताड़ित करने हेतू १४ लोगों पर 420,506 व R/w 34 of IPC धाराओं के तहत मामला दर्ज

जलगांव जिला सत्र न्यायालय के आदेश पर हुआ मामला दर्ज

सिन्धीराजा की सम्पादिका हर्षा जेठवाणी व पत्रकार नारायण जेठवाणी को भी प्रताड़ित करने हेतू १४ लोगों पर 420,506 व R/w 34 of IPC धाराओं के तहत मामला दर्ज

जलगांव जिला सत्र न्यायालय के आदेश पर हुआ मामला दर्ज

बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी, चालीसगांव के सभी ११ संचालक व उनके ३ पंटरों की हुई जमानत मंजूर

ब्लैकमेलिंग, दमबाजी, सामाजिक बहिष्कार व बच्चों की शादी तुड़वाने जैसे घिनौने काम करने की दी थी धमकी

नारायण जेठवाणी ने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 की धारा 397 के तहत मे. चालीसगांव में प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी की कोर्ट के फौजदारी किरकोल अर्ज नं.४४४/२०१७ दि.२०.८.२०१९ के आदेश के खिलाफ सत्र न्यायालय (जलगांव )में जो अपील की थी वो मंजूर की गयी। मा. सत्र न्यायालय के आदेश पर ही कुल 14 लोगों पर कार्रवाई करने का आदेश चालीसगांव न्यायालय को दिया गया। जिससे उनपर कार्रवाई हुई 14 ही लोगों को जमानत दी गयी।

चालीसगांव-यहां की पत्रकार सिन्धीराजा की प्रधान सम्पादिका सौ. हर्षा नारायण जेठवाणी व पत्रकार नारायण जेठवाणी को प्रताड़ित करने के मामले में यहां के बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी के चेअरमन व समाज पंचायत अध्यक्ष श्री शेखर कन्हैयालाल बजाज समेत 14 लोगों के खिलाफ जलगांव जिला सत्र न्यायालय के आदेश पर चालीसगांव न्यायालय में मामला दर्ज हुआ हैं। चालीसगांव की बंद होने की कगार पर पहुंची बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी के 11 संचालक, चेयरमन व सिन्धी समाज अध्यक्ष (मुखी) श्री शेखर कन्हैयालाल बजाज, अन्य पदाधिकारी सर्वश्री चंदरलाल तीर्थदास गोपलाणी, नानकराम खटूमल ओचाणी, केवलराम बचोमल वाधवाणी, प्रीतमदास खियलदास रावलाणी, लालचंद व्यापारीमल बजाज, हुंदलदास चिमनदास डेबाणी, साधुराम पेसूमल गेमनाणी, किशोर दयाराम नागवाणी, हीरानंद झटलोमल गोधवाणी (भुसावल), अशोक होलाराम कारड़ा, किरण अशोककुमार कारड़ा, सुनील (राम) मनोहरलाल गोपलाणी समेत कुल 14 लोगों की 6 मई 2022 शुक्रवार को दोपहर 3 बजे चालीसगांव मा. न्यायालय में मा. न्यायधीश ने सभी की जमानत मंजूर कर दी। मा. न्यायधीश साहब ने आगे
की 28 जून की तारीख देकर 14 ही आरोपियों को हर तारीख पर कोर्ट के सामने हाजिर रहने की हिदायक दी। बता दें की बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी के सभी संचालकों व उनके तीन पंटरों के खिलाफ भादंवि धारा 420,506 व R/w34 of IPC धाराओं के तहत कोर्ट में मामला दर्ज किया गया हैं। 21 लोग उनमें 11 बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी के डायरेक्टर, 4 उनके पंटर व पंचायत के कुछ लोग शामिल थे। इसी बीच अशोक साबलदास रावलाणी ने 2 लाख का झूठा मुकदमा होने के कारण सौ. हर्षा नारायण जेठवाणी पर दो लाख का किया केस वापिस ले लिया।

जिससे सत्र न्यायालय ने अशोक सावलदास रावलाणी व पंचायत के अन्य सदस्यों को छोड़कर बाकी बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी के ११ संचालकों व उनके 3 पंटरों के खिलाफ मामला दर्ज करने का आदेश किया। चालीसगांव कोर्ट ने बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी के 11 संचालकों व उनके 3 पंटरों के खिलाफ धारा 420,506, व R/w 34 of IPC धाराओं के तहत मामला दर्ज कर कोर्ट में हाजिर होने का आदेश दिया। उसी मुताबिक 14 ही लोग कोर्ट में हाजिर हुए व अपनी अपनी जमानत दे डाली। सौ. हर्षा नारायण जेठवाणी अपने सा. सिन्धीराजा में हमारे पोल खोलती हैं, उनपर पाबंधी
लगाने के लिये श्री शेखर बजाज व उनके अन्य साथियों ने उनके पति नारायण जेठवाणी को किस तरह प्रताडित किया, उसकी शिकायत न्यायालय में नारायण जेठवाणी ने मराठी भाषा में की थी। उसी शिकायत को पाठकों के लिये यहां पर वैसे ही मराठी में प्रकाशित की जा रही हैं ताकि पाठकों को अच्छी तरह से जानकारी मिल सके कि क्या है 420 का मामला

अर्ज-फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम ३९७ नुसार मे. चाळीसगांव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टातील फौजदारी किरकोड अर्ज नं.४४४/ २०१७ मधील दि.२०.०८.२०१९ रोजीच्या आदेशा विरुध्द

मी नारायण जेठवाणी में. कोर्टास सविनय कळवितो ते येणे प्रमाणे १) अपेलंट (नारायण जेठवाणी)

यांनी रिस्पॉडन्ट (शेखर बजाज) यांचे विरुध्द चाळीसगांव कोर्टात भा.दं.सं. कलम ३८४,४०६,४२८,४२३,४६४ ४६८,४७१,५००,५०६,१२०(५), The Prohibition of Social Boycat. Act २०१५ व ३४ प्रमाणे दि.१९.०६.२०१७ रोजी फिर्याद दाखल केली होती सदर फिर्याद मध्ये सीआर पी. सी. कलम १५६(३) प्रमाणे पोलीसां मार्फत चौकशी होणेकामी गुन्हा दाखल करण्याची विनंती करण्यात आली. परंतु मे. कोर्टाने दि.१०.०६.२०१७ रोजी सीआर.पी. सी. १५६(३) च्या मागणीवर दुर्लक्ष करून सदर केस फिर्यादीच्या पडताळणी साठी ठेवण्यात आली. फिर्यादी याने स्वतः शपथेवर जबाब दिला व फिर्यादीकडून चार साक्षीदारांचे मे. कोर्टात जबाब नोंदविले. त्यानंतर दि. २४.०१.२०१८ रोजी मे.कोर्ट नि सदरचे प्रकरणात सीआर.पी.सी. २८२ प्रमाणे पोलीसां च्या अहवालाच्या आदेश पारित केला त्याप्रमाणे सदर केस पोलीसांकडे तपासासाठी पाठविण्यात आली.

चाळीसगांव पोलीसांनी सदर केस मध्ये फिर्यादी व त्यांचे पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले व सदर अहवाल चाळीसगांव कोर्टात दि.०६.०२.२०१९ रोजी दाखल केला. सदर अहवानावर अपेलंट (नारायण जेठवाणी) याने खुलासा दिला व युक्तीवाद होऊन चाळीसगांव येखील मे.कोर्टाने दि.२०.०८.२०१९ रोजी आदेश करून सदरची फिर्याद ही सीआर.पी.सी. कलम २०३ प्रमाणे खारिज केली. त्याविरुध्द अपेलंट सदरचे क्रिमीनल रिव्हीजन मे. कोर्टात जळगांव येथे दाखल केली.

२) रिस्पॉर्डन्ट (शेखर बजाज) यांनी केलेल्या गुन्ह्याची अपेलंट (नारायण जेठवाणी) थोडक्यात माहिती दिली ते येणे प्रमाणे…

मी चाळीसगाव येथील स्थानिक रहिवासी असून चाळीसगांव येथील “बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी,” संचालित “इंदिरा गांधी सिन्धी हायस्कूल” येथे सन १९८० पासून शिक्षक म्हणून नोकरीस होता.
रिस्पाडेन्ट नं.१ ते ११ संचालक हेचाळीसगांव येथील बाबा हरदासराम
सिन्धी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी आहेत. रिस्पांडन्ट (शेखर बजाज) हा सदर संस्थेचा अध्यक्ष आहे. तसेच चाळीसगांव येथील सिन्धी समाजाच्या अनाधिकृत बेकायदेशीर “सिन्धी जनरल पंचायत” चा स्वयं घोषित अध्यक्ष आहे तसेच भारतीय जनता पक्षाचा नेता असून चाळीसगांव नगरपरिषदे चा नगरसेवक आहे. नं.१२ ते १५ हे शेखर बजाज चे खास कार्यकर्ते व पदाधिकान्यांचे नातेवाईक आहेत. तसेच रिस्पॉईन्ट नं.१६ ते २९ यांना रिस्पॉर्डन्ट नं. १ (शेखर बजाज) याने सिन्धी समाजाच्या अनाधिकृत बेकायदेशीर “सिन्धी जनरल पंचायत” चे पदाधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. हे सर्व शेखर बजाज साठी तो सांगेल ते काम करतात . नारायण जेठवाणी हा बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी या संस्थेत नोकरी करीत होता. नारायण जेठवाणी व इतर रिस्पर्डिन्ट हे एकाच समाजाचे म्हणजेच सिन्धी जातीचे आहेत. रिस्पॉडन्टचे आपसात संगनमत व जोडबळ असून ते समाजात अपली सत्ता टिकविण्यासाठी लोकांवर मनमानी, दडपशाही व दहशतीचा अवलंब करतात. ३) शेखर बजाज चाळीसगांव नगरपरिषदचा वार्ड नं.१८ मधून २०१६ साली भाजपाचा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहे. अपेलंटची पत्नी सी. हर्षा नारायण जेठवाणी ही चाळीसगांव येथून सुमारे २५ वर्षा पासून प्रसिध्द होणारे साप्ताहिक “सिन्धीराजा” या वृत्तपत्राची मालक व संपादिका आहे. सदर वृत्तपत्रात रिस्पॉडन्टचे बाबतीत त्यांनी समाजात घेतलेल्या अन्यायपूर्ण व चुकीच्या निर्णयाबाबत वेळोवेळी बातम्या प्रसिध्द केल्याने रिस्पाडन्ट मी अपेलंट व त्याचे पत्नीवर भयंकर आकस, राग व द्वेष आहे त्यामुळे रिस्पॉर्डन्ट हे नेहमी अपेलंटवर दबाव आणून सदर वृत्तपत्रात अपेलंटचे पत्नीने बातम्या टाकून प्रसिध्द करु नये, याकरीता रिस्पॉनडन्टच्या संस्थे मध्ये अपेलंट नोकरी करीत असल्याने अपेलंट चा ते नेहमी छळ करायचे व आपल्या खास माणसांकडून अपेलंट विरोधात खोटया तक्रारी लावायचे व अपेलंटचा मानसिक छळ करायचे.
४) अपेलंट रिस्पॉईन्ट च्या ताब्यातील संस्थेत शिक्षकाची नोकरी करीत असतांना रिस्पॉडेन्ट संगनमत व कट कारस्थान करुन अपेलंट्या त्रास देण्याच्या दृष्ट हेतूने रिस्पॉडंन्ट चे नातेवाईक व खास लोकांकडून अपेलंट विरुध्द सन २०१० ते २०११ चे दरम्यान खोट्या तक्रारी कराबला लावल्यात. त्या आधारे अपेलंटास अनेक शो कॉज नोटीसा देवून अपेलंट विरुध्द खोटे रेकॉर्ड तयार केले व अपेलंट विरुध्द खोटा चार्जशिट तयार केला व आपल्या मर्जीतील जळगांव येथील श्री जंगले यांच्या अध्यक्षते खाली रिस्पॉन्ड नं.१६(श्री अर्जुनदास खूबचंद कलवाणी) सह कमिटी स्थापन केली व खोटया तक्रारीच्या आधारे दि.१३.०६.२०११ रोजी संस्थेत ठराव करून अपेलंटस नोकरी वरुन काढून टाकले.

५) नारायण जेठवाणी ने सदर निर्णया विरुध्द म. शाळा प्राधिकरण नाशिक
येथे अपिल नं.३९/२०११ हे दाखल केले. सदर अपिलाचे कामकाज चालू असतांना नारायण जेठवाणी व त्याचे
पत्नीने , शेखर बजाज नी केलेल्या गैरकारभार व भ्रष्टाचाराबाबत केसेस दाखल केल्या त्यास विरोध शेखर बजाज याने स्वतः व त्यांचे हस्तकां मार्फत नारायण जेठवाणी व त्याचे कुटुंबियां विरुध्द दाखल भ्रष्टाचार व त्यांचे कुटुंबियां विरुध्द चाळीतगांव कोर्टात खोटया फौजदारी केसेस दाखल केल्या. अपेलंट ने रिस्पॉन्ड विरुध्द दाखल भ्रष्टाचार व गैरकारभारा च्या केसेस मध्ये चाळीसगांव पोलिस स्टेशनला एफ.आय. आर दाखल झाल्याने, चौकशी चे कामकाज सुरु झाल्याने शेखर बजाज नी आपसात संगनमत करुन शेखर बजाज ने समाजाच्या पंचायतीचे अध्यक्ष या नात्याने समाजाची बैठक घेऊन नारायण जेठवाणी वर दबाव व दडपण आणुन आपसात तडजोड करणेसाठी भाग पाडले व सदर तडजोडी प्रमाणे नारायण जेठवाणी ने शाळा प्राधिकरण नाशिक येथे दाखल केलेले संस्थे विरुध्द चे अपिल बिन शर्त काढून ध्याचे व या पुढे नारायण जेठवाणी च्या पत्नीच्या मालकीच्या साप्ताहिक सिन्धीराजा या वृत्तपपात शेखर बजाज विरुध्द कोणत्याही बातम्या प्रकाशित करु नये, या साठी सिक्युरिटी म्हणून दोन लाखाचा चेकबिन तारीखणच्या श्री अशोक साबलदास रावलाणी यास नारायण जेठवाणी च्या पत्नी ने द्यावा व नारायण जेठवाणी ने श्री अशोक हीलाराम कारडा, श्री किरण अशोक कारडा व श्री सुनिल मनोहर गोपलाणी यांना प्रत्येकी दोन लाखाचे चेक बिन तारीखचे द्यावे व नुकसान भरपाई म्हणून श्री किशोर दयाराम नागवाणी बांचेकडे रोख रु. दोन लाख नारायण जेठवाणी ने द्यावेत व शेखर बजाज यास नारायण जेठवाणी ने माफीनामा लिहून द्यावा व हे सर्व पुर्तता नारायण जेठवाणी ने केल्यावर संस्थे ची बैठक बोलावुन नारायण जेठवाणीस शिक्षक या पदावर बहाल करून नोकरीत सामावुन घेण्यासंबंधी चा ठराव शेखर बजाज संस्थच्या बैठकीत करतील जर नारायण जेवठवाणी ने तसे केले नाही, तर नारायण जेठवाणी च्या कुटुंबास समाजातून बहिष्कृत करण्यात येईल व नारायण जेठवाणी चे मुलाबाळाचे विवाह लग्न कार्ये इ. होऊ देणार नाही व समाजाचे कोणीही नारायण जेठवाणी च्या कुटुंबियांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावणार नाही अगर समाजाचा कोणीही व्यक्ती नारायण जेठवाणी कडे जाणार नाही अशा प्रकारे समाज बहिष्काराची शेखर बजाज नी धमकी देऊन नाईलाजाने नारायण जेठवाणी ला शेखर बजाज व इतरांनी सुचविलेली तडजोड स्विकारणे भाग पाडले.

६) नारायण जेठवाणी च्या पत्नीने श्री अशोक सावलदास रावलाणी याच्या नावाचे दिलेला चेक रक्कम रु. दोन लाखाचा तसेच नारायण जेठवाणी ने श्री अशोक होलाराम कारडा, श्री किरण अशोक कारडा व श्री सुनिल मनोहरलाल गोपलाणी वा तिघांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा चेक कायदेशीर व्यवहार भासवण्या साठी शेखर बजाज ने नारायण जेठवाणी कडून १००/-रुपयाचे चार स्टॅम्प मागवुन ते शेखर बजाज च्या मर्जीने तयार करून नारायण जेठवाणी व त्याची पत्नी ची सह्या घेऊन नोटरीकडे नोंदवुन घेतले व त्याच्या मजर्जीतील लोकांना साक्षीदार भासविण्याकामी श्री अशोक सावलदास रावलाणी, अशोक होलाराम कारडा,किरण अशोक कारडा व सुनिल मनोहर गोपलाणी कडून चेकस् घेऊन नारायण जेठवाणी व त्याची पत्नी यांच्या खात्यात जमा करण्यास लावले व सदर रक्कमा पुन्हा नारायण जेठवाणी व त्याच्या पत्नीस बँकेतून रोख काढून नं.१२ ते नं. १५ यांना परत करायला लावल्या येणे प्रमाणे नारायण जेठवाणी संस्थेच्या शाळेमध्ये या पूर्वी असलेल्या शिक्षक नोकरीत सामावुन घेत असल्याचे सांगुन समाजाच्या व शेखर बजाज चा नारायण जेठवाणी वर दबाव आणून याकामी सर्व बेकायदेशीर व्यवहार करून देणेस भाग पाडले. हा सर्व खोटा बनावट फसवणुकीचा व्यवहार सर्व रिस्पॉडन्टनी संगनमताने जोडबळ वापरुन दहशत निर्माण करुन केलेला आहे.

७) अशा प्रकारे शेखर बजाजनी नारायण जेठवाणी विरुध्द उसनवारीच्या व्यवहार दर्शविण्यासाठी रिस्पॉर्डन्ट १२ से १५ यांनी उसनवार रक्कमा दिल्याच्या बाबत खोटा व लबाडीचा चुकीचा व बेकायदेशीर दडपशाही करुन रेकॉर्ड तयार केला व शेखर बजाज याने नारायण जेठवाणी कडुन बाकी सर्व रिस्पॉन्ट व समाजातील लोकांचा दबाव आणून खंडणी म्हणून दोन लाख रु. घेतलेत. तसेच बनावट व खोटा दस्तऐवज हा खरा असल्याचे लोकांना व अपेलंटत भासवुन सुमारे चार वर्षापासून शेखर बजाज है नारायण जेठवाणी व त्यांचे पत्नीस ब्लैकमेल करीत आहे. ८) अपेलंट कडून वरील चार चेक्स
हे बिना तारीख टाकल्याचे मार्च १८१३ मध्ये शेखर बजाज याने घेतले हे रिस्पॉइंन्टनी आधिच लिहुन आणलेल्या माफिनामावर अपेलंट यास सही करण्यास लावले व रिस्पॉन्ट विरुध्द दाखाल केलेल्या कोर्टातील केसेस निकाली काढायला लावलेत. त्यानंतर तडजोडीत उरल्याप्रमाणे रिस्पॉइंन्टनी बाबा हरदासराम सिन्धी एज्युकेशन सोसायटी ची कार्यकारिणीची दि.१५.०४.२०१३ रोजी बैठक घेऊन नारायण जेठवाणीस इंदिरा गांधी सिन्धी हायस्कूल या शाळेत शिक्षका म्हणून नोकरीत पुर्वीप्रमाणे सामावून घेण्याचा ठराव केला व त्याप्रमाणे अपेलंट पुन्हा संस्थेत नोकरीस कामाला रुजु झाला. नारायण जेठवाणीस संस्थेने दि.१८.०४. २०१३ रोजी लेखी आदेश देवून सेवेत रुजू करुन घेतले. परंतु शेखर बजाज नी दुष्ट हेतूने व नारायण जेठवाणी ची फसवणूक करण्याच्या हेतूने जळगाव येथील म. शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे अपेलंटचा वेतनपत्रक तयार करुन न पाठविता, त्यांचे कडून अपेलंटस पुन्हा नोकरीवर घेणे बाबतच्या कागदपत्रांची पूर्तता केली नाही. तसेच दि.२८.८४. २०१४ रोजी पुन्हा संस्थेत ठराव करून अपेलंटस पुन्हा नोकरीतून काढून टाकले. त्याविरुध्द अपेलंटने शाळा प्राधिकरण नाशिक यांच्याकडे अपिल नं. २९/२०१४ हे दाखल केले आहे. त्याचे कामकाज चालू आहे. सदर अपिलात सुध्दा रिस्पॉइंन्डनी ठरल्याप्रमाणे तडजोड न करता अपेलेट विरुध्द खोटा जबाब व खोटया तक्रारी केलेल्या आहेत. अशा प्रकारे रिस्पॉर्डन्ट नी अपेलंट ची फसवणुक करुन गुन्हा केलेला आहे.

२) डिसेंबर २०१६ मध्ये चाळीसनांव नगरपरिषदे साठी निवडणुक घोषित झाली. त्यात शेखर बजाज यांने वार्ड नं.१८ मध्ये भारतीय जनता पक्षा तर्फे उमेदवारी घेतली त्यावेळेस शेखर बजाज हे नारायण जेठवाणीस धमक्या देऊ लागले की तुम्ही आमच्या विरोधात प्रचार करु नका व शेखर बजाज यालाच मतदान करा अन्यथा तुमचे विरुध्द दिलेले चेकचे फौजदारी खटले कोर्टात दाखल करण्यात येतील व तुम्हास समाजातून बहिष्कृत करण्यात येईल . अपेलंट ने लोकशाही असानण्या कारणाने शेखर बजाज चे ऐकले नाही. त्याचा राग घरुन शेखर बजाज ने अपेलेंट कडून बिगर तारखेचे घेतलेले चेकर वर मनमानी तारखा टाकुन रिस्पांईन्ड नं. १२ ते १५ यांचे मार्फत बँकेत टाकून ते चेकस बाऊन्स झाल्याने चाळीसगांव कोर्टात फौजदारी समरी केस नं. ६०/२०१७, समरी केस नं.६१/२०१७, समरी केस नं.२३९/ २०१७ व समरी केस नं. २४०/२०१७ हे दाखल केलेले आहेत. अपेलंट व त्याचे पत्नीने चेक बाऊन्सच्या नोटीसीस रिस्पाडन्ट नं.१२ ते १५ यानी खोटया केसेसे करू नयेत व बाकी नं.१ से १६ यांना पाठविली परंतू रिस्पॉडेंट नी सदर नोटीस उत्तराचे कोणीतीही दखल घेतली नाही व रिस्पॉडेंन्टनी अपेलंट यास उत्तर पाठवून त्याच्यावर केलेले आरोप नाकरलेले नाहीत. तसेच आरोपांचे खंडण ही केले नाही.

१०) अशाप्रकारे रिस्पॉडन्ट नं.१ ते २१ यांनी संगनमत करुन पूवींपासून नारायण जेठवाणी ची फसवणूक करण्याच्या वाईट हेतूने व उद्देशाने अपेलंट कडून रक्कम रु.२ लाख ब्लॅकमेल करुन खंडणी म्हणून बळजबरीने, दडपशाहीने समाजाची बहिष्कार करण्याची दहशत निर्माण करुन व धमकी देवून रिस्पोंडन्ट नं. ९ किशोर दयाराम नागवाणी यांच्या हस्ते घेतले. तसेच रिस्पॉन्ट १२ ते १५ यांच्या नावाने बिगर तारखेचे चेकस् प्रत्येकी २ लाख रुपये मार्च २०१३ मध्ये घेऊन सदर चेकचा दुरुपयोग करून खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा भिसवून
उद्देशाने चाळीसगांव कोर्टात अपेलंट व त्याचे पत्नी बाऊन्सच्या फौजदारी केसेस दाखल करून अपेलंट व त्याच्या पत्नी ची शहरात, सामाजात बेआब्रू,बदनामी करून फौजदारी गुन्हा केलेला आहे .
११) सदर गुन्ह्यातील घटनेची वेळ व क्रम बघितल्यास परिस्थितीजन्य प्रथम दर्शनी रिस्पोंडेन्ट विरुध्द गुन्हा शाचबत होते आहे. अपेलंटस शाळा प्राधिकरण नाशिक येथून पुर्वी दाखल केलेले अपिल नं ३९/२०११ हे दि. २९.११.२०१२ रोजी निकाली काढण्यास लावले. त्यानंतर अपेलंट कडून चाळीसगांव कोर्टात रिस्पॉर्डन्ट विरुध्द दाखल केलेले फौजदारी खटले निकाली काढण्यास लावले. तदनंतर दि.२१.०३.२०१३ रोजी अपेलंट कडून माफीनामावर सही घेतली मार्च २०१३ मध्ये रिस्पडिन्ट साठी उसनवार पावत्या व चेकस् दिले अपेलंट कडून सर्व पूर्तता झाल्यावर रिसपाडेंट नी एप्रिल २०१३ मध्ये संस्थेत अपेलंटसाठी ठराव करून पुन्हा अपेलंटस शिक्षक म्हणून नोकरीस घेतले वरील सर्व घटनाक्रम बघता रिस्पॉइंन्ट नी संगनमत करुन अपेलंटची फसवणूक केली आहे व अपेलंटस त्रास देण्याच्या हेतूने खोटया चेकच्या केसेस केल्या आहेत. त्या सर्व कट कारस्थानात सर्व रिस्पोंडेंन्टचा पुर्णपणे सहभाग आहे. सामाजिक बहिष्कार, फसवणूक, ब्लॅकमेलिंग, खोटे दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवणे, बदनामी, कट कालरस्थान, धमक्या देवून रिस्पॉडंन्टनी फौजदारी गुन्हा केलेला आहे.

१२) नारायण जेठवाणी याने सदर फिर्याद ही म. पोलिस निरिक्षक साहेब, चाळीसगाव. म. उपविभागीय पोलिस अधिकार साहेब, चाळीसगाव ,
म. अप्पर पोलिस अधिक्षक चालीसगाव, म. जिल्हा पोलिस अधिक्षक साहेब, जळगाव, म. पोलिस कमिश्नर, नाशिक या सर्वांना प्रत पाठवून अपेलंटने रिस्पॉर्डन्ट विरुध्द कायदेशीर कारवाई होणेची मागणी दि. १२.०५.२०१७ रोजी सादर करून केली आहे परंतु रिस्पॉर्डन्ट विरुध्द कोणतीही चौकशी अगर कारवाई आजपावेतो करण्यात आलेली नाही . त्याकरीता सदरची केस अपेलंट यास चाळीसगाव कोर्टात दाखल करणे बाध्य झाले होते.

परंतु चाळीसगाव येथील में कोर्टाने सदरची केस दि. २०.८८. २०१९ रोजी सीआर.पी. सी. कलम २०३ प्रमाणे खारीज केल्याने अपेलंट हा सदरचा रिव्हीजन अर्ज़ दाखिल करावा लागला.

मामला कोर्ट में अभी चल रहा हैं। सामने वाले करोड़ पति होने के चलते तारीख पर तारीख लेकर मामले को आगे खिंच रहे हैं।

Show More
Back to top button
error: Content is protected !!