ताज़ा ख़बरेंमहाराष्ट्र

महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांनी केली एकनाथ शिंदे वर टीका….

“गद्दारांच्या नायकाला म्हणावं दाढी खाजव आणि…”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

लातूर प्रतिनिधी.आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पनवेल दौऱ्यादरम्यान भाजपावर आणि एकनाथ शिंदे तसंच अजित पवारांवर कडाडून टीका केली. रायगड आणि मावळ हा मतदारसंघ म्हणजे एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला त्यांची राजधानी. अशा ठिकाणी आपला पवित्र भगवा फडकणार नाही तर मग दुसरं कुठलं फडकं फडकणार? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटावर तुफान टीका केली. तसंच मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा संदर्भत ठाकरी शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समाचार घेतला. तर एकनाथ शिंदेंचा उल्लेख त्यांनी गद्दारांचा नायक असा केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, “इथल्या खासदाराने गद्दारी केली आहे त्याला तर आडवा करायचाच पण जे सर्वपक्षीय शेठ आहेत म्हणजे काय ज्यांचं सरकार येतं त्यांच्याकडे जायचं. कुठेही गेलं की आपलं दुकान चालू.. म्हणजे राजकारणातली दुकानदारी करणारे आहेत त्यांची दुकानं बंद करायची आहेत. मी भाजपाबाबत म्हटलं आहे की अब की बार भाजपा तडीपार ते करायचं आहे. कारण इतका खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आला नव्हता.”एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दारांचा नायक
“एवढी फोडाफोडी केली, तरीही कट्टर शिवसैनिक हे शिवसेनेबरोबरच आहेत. त्यांना शिवसेनेने फक्त प्रेम दिलं. माधवराव भिडे इथे आहेत. मी लहानपणापासून त्यांना पाहतोय. शिरीष बुटाला आहेत. बाळासाहेबानंतर इतकी वर्षे झाली पण त्यांनी शिवसेना सोडली नाही. याला म्हणतात निष्ठा. हे जे काही गद्दार आहेत त्या गद्दारांचा नायक आहे त्यालाही विचारा तू दाढी खाजवत जरा आठव.. कारण आपण काही आठवायचं असेल तर डोकं खाजवतो हा दाढी खाजवतो. स्वतःचीच दाढी तू स्वतःच खाजव खरंतर पैसे खूप आहेत दाढी खाजवायलाही माणसं ठेवली असतील तर माहीत नाही. पण तुम्हाला मी काय दिलं नव्हतं? शिवसेनेने देता येईल ते सगळं तुम्हाला दिलं तरीही आमच्या पाठीत वार केला. शिवसेना ही ओळख तुमच्यासमोर आले म्हणून निवडून आलात. यांना वाटलं की घोड्यावर बसलोय म्हणजे घोडा माझाच. आता घोडा कसा लाथ घालतो ते कळेल आता.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवरही टीका केली.

Show More
Back to top button
error: Content is protected !!