
पत्रकार अरविंद कोठारी
ठाणे 12.एप्रिल.(प्रतिनिधी): प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज्यस्तरावर पक्षसंघटना मजबूत करण्याचा विडा उचलला असून.यासाठी पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय जिल्हावार निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे.
त्याचाच एक भाग म्हणून ठाणे काँग्रेस ची आढावा बैठक ज्ञानराज सभागृह , पाचपाखाडी, ठाणे येथे शहर काँग्रेस प्रभारी, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर,नवनियुक्त निरीक्षक झीशान हुसेन, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील,प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली
यावेळी ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी चित्रफितीसह काँग्रेस पक्षाची वाटचालीचे सादरीकरण करून आजपर्यंत केलेली आंदोलने, निषेध मोर्चे मासिक बैठका याची सचित्र माहिती विशद केली.
या वेळी मार्गदर्शनपर भाषण करतांना डॉ झीशान हुसेन त्यांनी सांगितले की मी प्रदेश काँग्रेस व आपल्या मधील दुवा म्हणून येथे आलो असून काँग्रेस च्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणार असून तुमचे म्हणणे सूचना मी प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचण्यासाठी आलेलो आहे.तसेच यावेळी कार्यकर्त्याना नव्या उमेदीने आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.यावेळी काँग्रेस चे निरीक्षक या नात्याने त्यांनी ब्लॉक अध्यक्षांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला व दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहर काँग्रेस अंतर्गत प्रत्येक ब्लॉक स्तरावरील बैठका घेणार असून सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष व ठाणे प्रभारी श्री शरद अहेर म्हणाले की काँग्रेस हा सर्वसामान्यांचा आणि सर्वधर्मसमूहाचा विचार मांडणारा पक्ष आहे. गांधी विचारसरणीची,सर्वसामान्य व्यक्ती हर्षवर्धन सकपाळ आपल्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. संकटाच्या काळात जे पक्षाला सोडून गेले त्यांना जाऊ द्या पक्षाला काही फरक पडत नाही.पक्षाचा कणा असलेला काँग्रेसचा कार्यकर्ता मुख्य प्रवाहाशी जोडून आपल्याला जोमाने काम करायचे आहे. येणारे दिवस हे काँग्रेस चे आहेत. काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्धार बैठकी वेळी करण्यात आला. या बैठकीस काँग्रेस चे आजी माजी नगरसेवकांसह विविध फ्रंटल व सेलचे पदाधिकारी तसेंच सर्व स्तरातील काँग्रेस पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.