
मालेगाव प्रतिनिधी -अनिकेत मशिदकर : मनपा प्रशासनाने तयार केलेले महानगरपालिकेचे सन २०२४-२५ चे अंदाजपत्रक आयुक्त रवींद्र जाधव यांना प्रशासनाकडून सादर करण्यात आले.
गुरुवारी सकाळी मनपा आयुक्त जाधव यांना आयुक्त यांचे परिषद दालनात मुख्य लेखापरीक्षक शबाना शेख व उपायुक्त सुहास जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत लेखाधिकारी राजू खैरनार यांनी मालेगाव महानगरपालिकेचे सन २०२४-२५ के अंदाजपत्रक सादर केले. हे अंदाजपत्रक सादरीकरणपूर्वी लेखाधिकारी राजू खैरनार यांनी आयुक्त यांचे स्वागत करून सत्कार केला. त्यानंतर लेखा विभागाच्या लिपिक मनीषा पाडवी यांनी मुख्य लेखापरीक्षक शबाना शाह यांचा सत्कार केला. सादरीकरणानंतर आयुक्त प्रशासक जाधव हे अंदाजपत्रकाचा अभ्यासा अंती आवश्यक ती दुरुस्ती करून त्यास अंतिम मंजुरी देतील.
या बैठकीस नगरसचिव साजिद अन्सारी, सहायुक्त अनिल पारखे, सचिन महाले, हरीश डिंबर, श्याम बुरकुल, लेखापरीक्षक शेखर वैद्य, शहर अभियंता कैलास बच्छाव, अग्निशमन अधिकारी संजय पवार, पंकज सोनवणे, आस्थापना पर्यवेक्षक तौसिफ शेख, प्रभाग अधिकारी बळवंत बाविस्कर, फैयाज अहमद, भरत सावकार, उपअभियंता एस.टी. चौरे, सचिन माळवाळ, वाहन विभाग प्रमुख अनिल कोठावदे, दिव्यांग कक्ष प्रमुख अ.कदिर अ. लतीफ, अधीक्षक रमाकांत धामणे, संतोष गायकवाड, निलेश पाटील, प्रमुख स्वच्छता निरीक्षक एकबाल अह. जान मोहम्मद, आनंद सिंग पाटील, वरिष्ठ लिपिक सचिन भामरे, सचिन मार्तंड, लिपिक हाफिज अन्सारी, सनी पवार, मनीषा पाडवी, अरुण सुरते, संदीप नागपुरे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.