डोंबवली: महापालिकेच्या बाजार व परवाना विभागामार्फ़त ज्या चिकन व मटण विक्रेत्यांनी अद्याप परवाना घेतलेला नाही अथवा घेतलेल्या परवान्याचे नुतनीकरण केलेले नाही अशा टिटवाळा, मोहने येथिल अनाधिकृत चिकन व मटन विक्रेत्यांवर काल दिवसभरात धडक कारवाई करुन त्यांच्या परवान्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ८ चिकन व मटन विक्रेत्यांनी परवाना नुतनीकरण न केल्याने त्यांना विनापरवाना व्यवसाय करीत असल्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. तर ४ दुकानदारांचे वजनकाटे जप्त करण्यात आले आहेत.
तसेच ज्या विक्रेत्यांनी परवाना घेतलेला नाही अशा १२ विक्रेत्यांकडून रक्कम रु. ३०,०००/- दंड वसूल करण्यात आला आहे. तरी चिकन व मटण विक्रेत्यांनी तातडीने परवान्याचे नुतनीकरण करावे तसेच ज्या विक्रेत्यांनी अद्यापही परवाना काढलेला नाही अशा विक्रेत्यांनी तातडीने परवाना काढावा असे आवाहन उप आयुक्त (परवाना विभाग) वंदना गुळवे यांनी केले आहे. अशा प्रकारची कार्यवाही सातत्याने केली जाणार असल्याची माहिती परवाना विभागाचे सहा. आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी दिली आहे