Uncategorized

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती डोंबिवली शहरात उत्साहाने साजरी

डोंबिवली शहरात आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली

दिनांक १४/०४/२०२४ रोजी डोंबिवली शहरात संपूर्ण भीमजयंतीचे वातावरण दिवस भरात दिसून येत होते, जागोजागी १३३ व्या जयंतीचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे बॅनर,तैलचित्र लावण्यात आले होते कोपर रोड,राहुल नगर,फुले नगर, इंद्रानगर, समता नगर येथून सायंकाळी मोठया उत्साहात वाजत गाजत बाबासाहेबांची प्रतिमेचे रथात ठेऊन मिरवणूक काढण्यात आली, कोपर रोड सिद्धार्थ नगर येथील मिवाणुकीत लहान मुलींचा बाबासाहेब यांच्या गीतावर बसवलेला नृत्य हा सर्व मिरवणुकीत आकर्षक दिसून येत होता.

तसेच डोंबिवली पूर्व येथील पुतळ्याचे ठिकाणी सर्व मिरवणूक सांगता समारोप करून सार्वजनिक अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर मिरवणूकि चे नेतृत्व प्रल्हाद जाधव, अंकुश गायकवाड, जय जाधव (रिपाई आठवले )आनंद नवसागरे राहुल नवसागरे (रिपब्लिकन सेना)यांनी केले तसेच गणेश गायकवाड, मुकुंद रोहिमल (वंचित बहुजन आघाडी डो.प.)किशोर तांबे, अनिल खैरनार (रिपाई गवई)ह्या सर्व पक्ष आणि इतरांनी जयंतीत सहभागी होऊन सर्व भीम सैनिकांना शुभेच्छा देण्यात आल्या

Show More
Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!