
जालना जिल्हा प्रतिनिधी संदीप पा नवल
भाजपाच्या तालुका उपाध्यक्षपदी डॉ. संजय देशपांडे यांची निवड.
भोकरदन
भोकरदन शहरातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. संजय विनायकराव देशपांडे यांची भोकरदन तालुका भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सदरील निवड झाल्याचे तालुकाध्यक्ष गणेश ठाले यांचे पत्र त्यांना शुक्रवार दिनांक 28 रोजी पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश ठाले यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून या पक्षाचे ध्येय धोरणे तसेच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार यांच्यामार्फत होणाऱ्या जनकल्याणकारी कामांचे वयोजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्या साठी आपली माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्या शिफारशीनुसार या पदावर नियुक्ती करण्यात आली असून या पुढील काळात आपण पक्ष वाढीसाठी काम करावे. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चिने, ज्ञानेश्वर पाटील तळेकर व इतर भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.